लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

भाकर फाऊंडेशनचा आरोग्यदायी उपक्रम, १३० महिलांना वर्षभर देणार मोफत सॅनिटरी पॅड

मुंबई/प्रतिनिधी– भारतात कायदेशीर रित्या स्त्री स्वातंत्र आणि समानतेच्या अनुषंगाने बाजू मांडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री सक्षमतेसाठी उचललेले पाऊल म्हणजे समस्त माणूस जातीला त्यांनी दिलेला एक परिवर्तनीय विचार होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या याच विचाराला अनुसरून ‘भाकर फाऊंडेशन’ च्या माध्यमातून, बाबासाहेबांना त्यांच्या १३० व्या जयंती निमित्त अभिवादन करताना, गोरेगाव पश्चिम येथे पुढील एक वर्षासाठी १३० मुली, असंघटित महिला कामगार व एकल महिलांच्या सॅनिटरी पॅडची जबाबदारी घेतली असून पुढील वर्षभर महिलांना मोफत सॅनिटरी देण्यात येणार आहे अशी माहिती भाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक सोनावणे यांनी दिली.
भाकर फाऊंडेशनच्या वतीने पुढील वर्षभर महिलांच्या आरोग्य संदर्भात विविध माहिती चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.सायरा शेख,आरती डोईफोडे,चाऊस शेख,आकाश क्षिरसागर, बजरंग बाविशे यांनी एकत्र येऊन गोरेगाव येथील महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करून १३० वी भिम जयंती साजरी केली.आपला विचार कृतिशील पणे मांडून,समाजा समोर एक नवा विचार ठेवणे हि बाबासाहेबांनी दिलेली शिकवणच आपण त्यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन स्वरूपात देत आहोत याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया भाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक सोनावणे यांनी नेशन न्यूज़ मराठीला दिली
या उपक्रमात सायरा शेख,आरती डोईफोडे, धनश्री नाईक,आकाश क्षिरसागर, बजरंग बाविशे, चाऊस शेख,सरीता पोटे, मयुर जाधव, सुमित कांबळे, जितन शेख, जमिला शेख, साहिल पोटे, सुचिता सोनावणे जाहिदा शेख, मैफुज शेख आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »