कल्याण प्रतिनिधी – आई वडील ओरडतात म्हणून घर सोडून गेलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना सुखरूप शोधून काढण्यात कल्याण पोलिसांना यश आले आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि पश्चिमेतील खडकपाडा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
कल्याण पूर्वेतील विजय नगर परिसरात राहणारी 17 वर्षांची मुलगी आई घरातील कामे सांगते म्हणून रागाच्या भरात घर सोडून गेली होती. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत या मुलीला शोधण्यात यश मिळवले.
तर कल्याण पश्चिमेत राहणारा 16 वर्षांचा मुलगा आई वडील ओरडतात म्हणून घर सोडून गेला होता. त्याला खडकपाडा पोलिसांनी पुण्याच्या खडकी येथून सुखरूप परत आणण्यात यश मिळवले. या दोन्ही कामगिरीबद्दल या मुलांच्या पालकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
लोकप्रिय बातम्या
व्हिडिओ
पालक ओरडतात म्हणून घर सोडले,दोघा अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश कल्याण पोलिसांची कामगिरी
- March 30, 2021
- by nationnewsmarathi
- 0 Comments
- 39 Views

