व्हिडिओ
मलंगगडावर पुन्हा आढळला बिबट्या,बिबट्या सीसीटीव्हीत कैद
- September 30, 2020
- by nationnewsmarathi
- 0 Comments
- 37 Views
प्रतिनिधी.
अंबरनाथ – मलंगगडावर पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळला आहे. मलंगगडाच्या पहिल्या दर्ग्याजवळ मंगळवारी रात्री हा बिबट्या वावरताना आढळून आला. रात्री पावणे दहाच्या सुमारास बिबट्या या परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला. यापूर्वीही अनेकदा मलंगगड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आढळला असून हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात या भागात येत असल्याची शक्यता आहे.