थोडक्यात शिक्षण

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना)विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी 17/03/2024 रविवारी घेण्यासाठी वेळापत्रक दिलेले होते. या चाचणीचे पुर्व नियोजन क.डों.मनपा शिक्षण नियोजनबद्ध प्रकारे केलेले होते,त्यासाठी सिआरसी प्रमुख आणि परिक्षा केंद्रांचे संचालक यांना मिटिंगमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. सिआरसी प्रमुखांचे परिक्षा केंद्रावर नियंत्रण होते.

क.डो.मनपा शिक्षण विभाग क्षेत्रात एकूण 627 असाक्षरांची प्रथम चाचणी घेण्यात आली असुन एकूण 82 परिक्षा केंद्रावर असाक्षरांची परिक्षा आज सकाळी 10:00 ते सायं.5:00 वाजेपर्यंत घेण्यात आली.
सदरील परिक्षा केंद्रावर अधिकारी, कर्मचारी , SSA कर्मचारी यांच्या भेटी ,परिक्षेच्या वेळी झाल्या. वरिष्ठ नागरिक यांनी देखील काही ठिकाणी असाक्षरांची चाचणी दिली.

सदरील परिक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी रंजना राव , शिक्षण अधिकारी विजय सरकटे, यांच्या आदेशानुसार आणि सुचनेनुसार सदरील परिक्षा चांगल्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकाऱी , कर्मचारी (SSA) सर्व सिआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.
शिक्षण विभागाचे सदरील परिक्षेचे कामकाज शि.वि.अधिकारी लक्ष्मण जाधव नोडल अधिकारीआणि चंद्रमणी सरदार -विषय तज्ञ तसेच तंत्रस्नेही शिक्षक विलास विखार सर यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »