ताज्या घडामोडी शिक्षण

बार्टी व उद्योग संचालनालयाच्या हाय टेक प्रशिक्षण कार्यक्रमात ९५ तरुणांचा सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे पुरस्कृत आणि उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत एमसीईडीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित हायटेक परिचय प्रशिक्षण कार्यक्रम अचिएव्हर्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट कल्याण येथे घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एकूण ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

त्यातील ४५ विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमामध्ये पुढील दोन महिन्यात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासंदर्भात संपूर्ण माहिती बिर्ला कॉलेजचे प्राध्यापक राजेश यांनी सादरीकरणाद्वारे दिली. एम. सी. ई. डी. प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण व उद्योजकता परिचय कार्यक्रमाच्या आवश्यकतेबद्दल मार्गदर्शन केले. बार्टीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी बार्टी राबवित असलेल्या विविध योजना तसेच कार्यक्रमा बद्दल माहिती दिली.

यामध्ये कॉलेज प्राचार्य श्रीमती सोफिया, आय. टी. विभाग प्रमुख कविता खानवीलकर, बँक ऑफ महाराष्ट्र (लीडबँक) अधिकारी सविता पावसकर, एम. सी. ई. डी. जिल्हा प्रकल्प अधिकारी सुबोधसिंग बायस, बार्टी जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती मेघा पवार व जिल्हा सर्व समतादूत हजर होते. सूत्रसंचालन डॉ. संध्या येवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »