लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

सणासुदीत झेंडूला भाव नसल्याने शेतकाऱ्यांसह व्यापाऱ्याची चिंता वाढली, शेतकाऱ्यांसह फुल व्यापाऱ्यांची झोळी रिकामीच

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – दादर च्या फुल मार्केट पाठोपाठ कल्याण एपीएमसी मार्केटच्या आवारात मोठे फुल मार्केट आहे.श्रावण महिना व त्यानंतर सुरू होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या फुल मार्केट मध्ये फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. श्रावण महिना व त्यानंतर येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या फुल मार्केट मध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली खरी मात्र ग्राहकच नसल्याने विक्रीसाठी आणलेली फुले कवडी मोल किमतीत विकण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवली आहे .

कोरोना संकटामुळे सनांवर असलेले निर्बंध व मंदिरे बंद असल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याना बसला आहे .अनेकदा दिवसभर या फुलांना ग्राहक नसल्याने फुले फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे .
सणासुदीच्या काळात 50 ते 60 रुपये किलोने विकली जाणारी झेंडूची फुले अवघ्या 10 ते 15 रूपये किलोने विकली जात असल्याने इतका खर्च करून आणि मेहनत करूनही फुलाची विक्री न झाल्याने शेतकर्यांनी आता जगायचे कसे? असा सवाल केला आहे. सणासुदीच्या काळात शेतकरी व्यापाऱ्यांचे होणारे हाल पाहता निदान सणासुदीच्या काळात तरी मंदिरे सुरू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांचा व्यापार यांनी सरकार कड़े केली आहे।आता सरकार यावर काय निर्णय घेते यावर शेतकरी व व्यापारी यांचे लक्ष्य लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »